नांदेड(प्रतिनिधी)-बोरलेपवार लुट प्रकरणातील पाच आरोपींची पोलीस कोठडी तीन जून पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी 14 लाख 84 हजारांपैकी 4 लाख 88 हजार 400 रुपये, एक दुचाकी गाडी व एक पिस्टल जप्त केले आहे.
10 मे रोजी ओम सखाहरी बोरलेपवार यांची लुट झाली. या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात असलेला गुन्हा पुढे स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाला.स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे यांच्याकडे देण्यात आला. बोरलेपवार यांच्या दुकानातील एक सेल्समन उमेश सुंदरलाल यादव, त्याचा सहकारी सोनु हिरालाल रिंदकवाले, सच्चिदानंद मारोती सुर्यवंशी आणि शेख अब्बु उर्फ शेख आवेज शेख महेबुब यांना अटक झाली. दुसऱ्या दिवशी गुरमुखसिंघ सेवकसिंघ गिल याला अटक झाली. या सर्वांना न्यायालयाने 31 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. 31 मे रोजी पुन्हा 5 जणांना न्यायालयात हजर करून त्यांच्याकडून 9 लाख 95 हजार 600 रुपये जप्त करणे आहे, एक दुचाकी जप्त करणे आहे तसेच लुट होतांना हजर असणारा शेख अबरार नावाचा आरोपी पकडणे आहे असे सांगितल्यानंतर न्यायालयाने या पाच जणांची पोलीस कोठडी 3 जून पर्यंत वाढवून दिली आहे.
बोरलेपवार लुट प्रकरणात आरोपींची पोलीस कोठडी वाढली