नांदेड(प्रतिनिधी)-एका प्रियकराने आपल्या मुलांकडे जाण्याच्या कारणावरून प्रेयसीला जंगलात नेऊन दगडाने ठेचून तिचा खून केल्याचा प्रकार किनवट तालुक्यातील वडोली येथे घडला आहे.
किनवट येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार रामेश्र्वर भोळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वडोली ता.किनवट येथील दत्तमंदिराकडे जाणाऱ्या जंगलातील रस्त्यावर 1 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास बबीता मंगेश आडे (32) रा.लसनवाडी ता.माहूर या महिलेचे प्रेत सापडले. तिच्या डोक्यावर दगडाने ठेचून तिचा खून करण्यात आला होता. पोलीसांच्या माहितीप्रमाणे पंकज सुभाष जाधव 46 रा.पलाईगुड्डा ता.माहूर ह.मु.सुरदासपूर मंडल नेरडगुंडा जि.आदिलाबाद याने तिचा खून केला होता. बबीता आडे ही पंकज जाधवची प्रेयसी आहे. दि.1 जून रोजी पंकज जाधवच्या मुलांना भेटण्यासाठी पालाईगुडडाला का येत नाही या कारणावरून प्रियकर आणि प्रेयसीमध्ये भांडण झाले आणि या भांडणातून त्याने तिला दगडाने डोक्यावर ठेचून तिचा खून केला.
किनवट पोलीसंानी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 प्रमाणे गुन्हा क्रमांक 181/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक थोरात यांच्याकडे देण्यात आला आहे. पोलीसांनी पंकज सुभाष जाधवला अटक केली आहे.
प्रियकराने प्रेयसीचा दगडाने ठेचून केला खून