जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ३ जून २०२१ रोजी कोरोना बाधेने कोणाचाही जीव घेतलेला नाही असे लिहिण्याचे भाग्य अनेक दिवसांनी प्राप्त झाले आहे.त्याचा अत्यंत आनंद होत आहे. जनतेने आता तरी निष्काळजी करू नये अशी आमची पण विनंती आहे.आता नांदेड जिल्हयातील नवीन प्राप्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी सुद्धा ५ पेक्षा कमी असल्याने नांदेड जिल्हा पूर्ण पणे उघडला जाणार आहे.तरीही मागील चुकांना लक्षात ठेवून जनतेने पुढील काळात कोरोना नियमावली प्रमाणे वागावे, सर्व दक्षता घेऊन घराबाहेर पडावे असे आम्हालाही वाटते.
आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात -२७, लोहा-०२, नांदेड ग्रामीण-१६, अर्धापूर – ०२, हदगाव – ०२, हिमायतनगर -०३, किनवट – ०३, हिंगोली – ०३, मुखेड-०३, कंधार-०१,मुदखेड-०१,नायगाव-०१, माहूर – ०१, परभणी – ०२, असे ६७ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्र -३५, हदगाव-०२, मुखेड-०२, नांदेड ग्रामीण-११, कंधार – ०२, नायगाव – ०२, हिंगोली-०३,किनवट-०२,भोकर-०२,मु
शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -१३, जिल्हा रुग्णालय-०३, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-३७, किनवट-२५, मुखेड-०८, देगलूर -०७, बिलोली-०६,माहूर-१७, नायगाव-०१, उमरी-०१, हदगाव-०४, लोहा-०६, भोकर – ०१, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -३८१, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -२१६, खाजगी रुग्णालय-७३, असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात २५ रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी -१२२, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल -११८.