नांदेड(प्रतिनिधी)-तामसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टकराळा पाटीजवळ ऍटोचा अपघात होवून एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. देगलूर-रामपूर रस्त्यावर एका अज्ञात वाहनाने 85 वर्षीय महिलेला धडक देवून त्यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरला आहे. अर्धापूर तालुक्यातील भोकरफाटा ते बारड रस्त्या दरम्यान एक ट्रक्टर उलटून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हनमनलु सायन्नासा तेलीवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जून रोजी सायंकाळी 7.30 ते 3 जूनच्या पहाटे 7.45 वाजेदरम्यान देगलूर ते रामपूर जाणाऱ्या रस्त्यावर एकनाथ कांबळे यांच्या शाळेजवळ कोणी तरी अज्ञात वाहनाने भरवेगात गाडी चालवून त्यांच्या आई मन्याबाई सायन्नासा तेलीवार (85) यांना जोरदार धडक दिली त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. देगलूर पोलीसांनी हा अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक पुनम सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
धोडींबा विश्र्वनाथ सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील विश्र्वनाथ आडेलू सुर्यवंशी (50) हे 2 जूनच्या सायंकाळी 6 वाजेच्यासुमारस भोकर ते हिमायतनगर रस्त्यावरील टाकराळा पाटीसमोरून पायी घराकडे येत असतांना ऍटो चालक बालाजी भगवान बोने रा.पारवा(बु) ता.हिमायतनगर यांनी आपल्या ताब्यातील ऍटो निष्काळजीपणे चालवून विश्र्वनाथ सुर्यवंशी यांना पाठीमागून धडक दिली आणि ऍटो घेवून पळून गेला आहे. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक पांढरे अधिक तपास करीत आहेत.
आज दुपारी 4 जून रोजी भोकर फाटा ते बारड रस्त्यादरम्यान तुकाराम पेट्रोल पंपाच्या कॅनलकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर एक ट्रक्टर उलटला अपघात झाल्यानंतर ट्रॅक्टरला उचलण्यासाठी क्रेन बोलवावी लागली. बारड महामार्ग पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक येवते, पोलीस अंमलदार शेख स्वाधीन ढवळे, संतोश वागदकर, निलेवार, अमोल सातारे आणि गनी यांनी स्थानी गावकऱ्यांच्या मदतीने तुषार सुर्यभान कळणे (15) आणि पुरभाजी मारोतराव गिरे (20) दोघे रा.सरेगाव यांना ट्रक्टरखालून बाहेर काढले. या दोघांचे प्राण तेथेच गेले होते. आज पडलेल्या पावसामुळे हा अपघात घडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज आणि मागील 24 तासात तीन अपघातात चार जणांचा मृत्यू