नांदेड(प्रतिनिधी)-जांब (बु) ता.मुखेड येथे एकापेक्षा जास्त ठिकाणी झालेल्या चोरीचा एकच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरी प्रकरणात दोन दुकाने फोडून चोरट्यांनी 1 लाख 58 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. जानापूर ता.लोहा येथून एक 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.
शिवराज अनंतराव अमिलकंठवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जूनच्या रात्री 11 ते 3 जूनच्या पहाटे 6 वाजेदरम्यान मौजे जांब (बु) ता.मुखेड येथे त्यांचे आणि गजानन दळवे यांचे अशी दोन दुकाने चोरट्यांनी फोडली. यातून दुकानातील साहित्य आणि रोख रक्कम असा 1 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक जी.डी.काळे अधिक तपास करीत आहेत.
जानापूर येथील दत्ता सटवाजी लोखंडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.टी.5257 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 1 जूनच्या सकाळी 10 ते 2 जूनच्या पहाटे 3.30 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
जांब येथे दोन दुकाने फोडून 1 लाख 59 हजारांचा ऐवज लंपास