नांदेड(प्रतिनिधी)-आज 5 जून पर्यावरणाचे दिनाचे औचित्य साधून पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पोलीस मुख्यालय येथे 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 1500 झाडांचे वृक्षारोपण झाले. या झाडांना पुर्णपणे जगविण्याची सुचना करतांना प्रमोदकुमार शेवाळे म्हणाले. आज प्राणवायु विकत घ्यावा लागत आहे. झाडांचे संगोपण केले तरच ती समस्या संपणार आहे.
आज सकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी एकत्रीत पणे 500 झाडांचे वृक्षारोपण केले. तसेच जिल्हभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये मिळून 1500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. आज पर्यावरणाचा होणारा ऱ्हास पाहता झाडे जगली तरच सृष्टी जगेल आणि त्यानंतरच माणसे जगतील अशी सुचना आपल्या अधिकारी व अंमलदारांना देतांना पोलीस अधिक्षकांनी या झाडांचे पुर्णपणे संगोपन करण्याच्या सुचना दिल्या. या झाडांना कायमस्वरुपी पाणी मिळावेत याचीही सोय केली. या प्रसंगी राखीव पोलीस निरिक्षक शहादेव पोकळे, पोलीस कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रकाश मुळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक ए.आर.शेख, कवायत निर्देशक शिवाजी पवार, पोलीस अंमलदार गंगाधर घुगे यांची उपस्थिती होती.
पोलीस मुख्यालय व सर्व पोलीस ठाण्यांमध्ये 2 हजार झाडांचे वृक्षारोपण