कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार;गुन्हेगार फरार
नांदेड,(प्रतिनिधी)- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून अल्पवयीन बालिकेला लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ७ जून रोजी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेस शिनू भुजंग गादगे याने लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारीरिक संबध प्रस्थापित करून पळवून नेले.याबाबत पीडित मुलीच्या काकाच्या तक्रारीवरुन वरून शिनू भुजंग गादगे विरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यातगुरनं ६६/२०२१,भादंवि कलम ३६३,३७६ (२) बालकाचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ३,४ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मांटे हे करीत आहेत.दरम्यान या प्रकरणातील आरोपी शिनू भुजंग गादगे फरार असुन पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.