नांदेड(प्रतिनिधी)- शंभरी पार केलेले पेट्रोल व शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले डिझेलचे भाव सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीत आणणारे ठरत आहेत. इंधनाच्या या भाववाढीमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या या भाववाढीविरुध्द नांदेड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर धरणे आंदोलन केले. त्यामुळे कांही काळ शहरातील वाहतूक कोलमडली होती.
नांदेड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री अशोकराव चव्हाण व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे विधान परिषद प्रतोद व महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,महापौर सौ.मोहिनीताई येवनकर, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे सभापती स.विरेंद्रसिंघ गाडीवाले, ब्लॉक अध्यक्ष किशोर स्वामी, विनोद कांचनगिरे, कार्याध्यक्ष किशन कल्याणकर, रहीम खान, सुरेश हटकर यांनी केले.
आज पेट्रोल पंपांवर झालेल्या आंदोलनात केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणा विरोधात काँग्रे्रस कार्यकर्त्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. काँग्रेसचे सर्व नगरसेवक त्यांच्या-त्यांच्या भागातील पेट्रोल पंपावर हातात फलक घेवून शेकडो कार्यकर्त्यांसह सकाळी 10 वाजताच दाखल झाले. आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत,जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर व महापौर मोहिनीताई येवनकर यांनी आंदोलन करीत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर आंदोलन स्थळास भेटी दिल्या.
यावेळी बोलतांना आ.अमरनाथ राजूरकर म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या काळामध्ये कच्च्यातेलाचा भाव दीडशे डॉलर इथपर्यंत पोहोंचले होते. परंतु मनमोहनसिंग सरकारने 65 ते 70 रुपये या माफक दरात सामान्य नागरिकांना पेट्रोल उपलब्ध करुन दिले. आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्यातेलाचा भाव 50 डॉलर प्रति बॅलर झाला असतानासुध्दा पेट्रोल मात्र शंभर रुपयांच्यावर तर डिझेल शंभर रुपयांच्या जवळपास विकल्या जात आहे. या जनतेच्या पैशातून केंद्र सरकारने 25 ते 30 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरी सुध्दा रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारला पैसे घेण्याची वेळ आली आहे. तर मग हे पैसे गेले कुठे? असा सवाल करतानाच चारशे रुपये घरगुती सिलेंडरचा भाव झाला असताना रस्त्यावर येवून आंदोलन करणार्या स्मृती इराणीची आता स्मृती कुठे गेली? असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना माजी पालकमंत्री डी.पी. सावंत म्हणाले की, देशामध्ये जर भाजपाचे सरकार आले तर 35 रुपयात पेट्रोल जनतेला मिळेल असे रामदेव बाबा त्यावेळेस सांगत होते. त्यांच्या विचाराचे सरकार सत्तेत आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्यातेलाचे भाव आकाशावरुन जमिनीवर आले. परंतु प्रत्यक्षात पेट्रोल आणि डिझेलच्या भावानी आकाशाला स्पर्श करण्यास सुरुवात केली आहे.
शहरातील विविध ठिकाणच्या 8 पेट्रोल पंपावर काँग्रेस पक्षाने केंद्र शासनाच्या भाववाढीविरोधात आंदोलन केले. यामध्ये तरोडा खु.येथील पेट्रोलपंपासमोर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सौ.कविता कळसकर, किशन कल्याणकर, दिपक पाटील, सत्यपाल सावंत,बाळू राऊत, सौ.सुनंदा पाटील, पद्मा झंपलवाड, समदानी, तरोडा बु. येथील पेट्रोलपंपासमोर सतिश देशमुख तरोडेकर, संतोष मुळे, धम्मा कदम, सखाराम तुप्पेकर, गोविंद तोरणे, धंनजय उमरीकर, गुंडेगावकर पेट्रोल पंपासमोर प्रदेश उपाध्यक्ष बी.आर.कदम, विरेंद्रसिंघ गाडीवाले, किशोर स्वामी, आनंद चव्हाण, उमेश पवळे, मंगलाताई धुळेकर, अनिता हिंगोले, ललिता कुंभार, दयानंद वाघमारे,सदाशिव पुरी, श्याम कोकाटे, महेंद्र पिंपळे,भालचंद्र पवळे, विश्वास कदम, जी.नागय्या, अविनाश कदम, संघरत्न कांबळे, व्हिआयपीरोडवरील पेट्रोल पंपासमोर महापौर सौ.मोहिनीताई येवनकर,डॉ.सौ.रेखा चव्हाण, सभापती संगिता पाटील, उमेश चव्हाण, नागनाथ गड्डम, ज्योती रायबोले, फेरोजभाई, दुष्यंत सोनाळे, मुन्तजिब, संदिप सोनकांबळे, विजय येवनकर, विठ्ठल पाटील, सुभाष रायबोले, रुपेश यादव, गोपी मुदीराज, विकी शिकारे, अमित वाघ. वर्कशॉप येथील पेट्रोल पंपासमोर किशोर भवरे, राजू यन्नम, संजय पांपटवार, संजय पंडित, भारत खिल्लारे, केशव सावंत,प्रणिता भरणे.
कौठा येथील पेट्रोल पंपासमोर अमित तेहरा, भानूसिंग रावत,अमित मुथा,धीरज यादव, रमेश गोडबोले, शोएब मजहर, राजू काळे, डिंपल नवाब. बाबा पेट्रोल पंपासमोर माजी महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर मसूद खान, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शमीम अब्दुला, चाँदपाशा, अब्दुल गफार, अ.लतीफ, म.नासेर, वाजीद जहागिरदार, सुरेश हटकर, अ. हाफीज, फारुक बदवेल, शेख अस्लम, अ.रशिद , हबीब बागवान, शेख जावेद, शेरअली, मो.हबीब, बाबूखान, शेख जावेद.
सिडको परिसरातील आंबेडकर चौक येथे विनोद कांचनगिरे, राहूल हंबर्डे, प्रा.ललिता बोकारे, डॉ.करुणा जमदाडे, संजय मोरे, सिध्दार्थ गायकवाड, डॉ.नरेश रायेवार, भि.ना.गायकवाड, उदय देशमुख, राजू लांडगे, शेख मोईन लाठकर, भुजंग स्वामी, प्रसन्नजित वाघमारे, प्रमोद टेहरे, प्रा.रमेश नांदेडकर, संजय श्रीरामे, कविता चव्हाण, त्रिशला कांबळे, विमल चित्ते या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आजच्या या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या आंदोलनास सामान्य नागरिकांनीही पाठिंबा दिला होता.
पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा कॉंगे्रसच्यावतीने धरणे आंदोलन