अर्धापूरात दिव्यांगाना तिनचाकी विजेवर चालनारा रिक्षा वाटप

अर्धापूर(प्रतिनिधी)- येथील दिव्यांगाना विजेवर चालनारा रिक्षा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख यांच्या हस्ते दि.९ बुधवारी रोजी श्रावण शिनगारे यांना वाटप करण्यात आला.
     अर्धापूर येथील दिव्यांग श्रावण शिनगारे हे मागील अनेक वर्षांपासून हाताने चालवायचा तीनचाकी रिक्षा चालऊन छोटे उद्योग करून आपल्या कुटुंबाची उपजिविका चालवतात त्यांनी विजेवर चालनारा रिक्षा मिळीवा यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख यांनी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे यांच्या पुढाकाराने श्रावण शिनगारे यांना विजेवर चालनारा रिक्षा मिळऊन दिला यावेळी अँड अमोल देशमुख,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सखाराम क्षीरसागर,जिल्हा चिटणीस योगेश हाळदे,चाऊस आदी उपस्थितीत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख म्हणाले की श्रावण शिनगारे वाढत्या वयामुळे त्यांना आता हा हाताने चालवायचा रिक्षा जड जात होता. सातत्याने ते नेहमी बॅटरी रिक्षा मिळवून द्या  म्हणत असत.  भाजप दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे यांना  सांगितले त्यांनी लगेच  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्याला १ कोटी रु.चे अपंगांना साहित्य वाटप केले होते.या योजनेतून तीनचाकी विजेवर चालनारा रिक्षा श्रावण शिनगारे यांना  मिळऊन देऊन दिलासा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *