नांदेड(प्रतिनिधी)-3 लाख 50 हजार रुपये उसणे घेवून पैसे परत मागणाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लखमीरसिंघ जसपालसिंघ राघी (38) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हरप्रितसिंघ उर्फ हॅपी सुनकेवार याला दुचाकी गाडी गहाण ठेवून 1 लाख रुपये दिले. पुन्हा 2 लाख रुपये धनादेशाद्वारे दिले आणि 50 हजार रुपये रोख दिले. 3 महिन्याच्या करारावर हे पैसे देण्यात आले होते. 7 जून रोजी दिलेले साडे तीन लाख रुपये परत मागितले असता रात्री 9 वाजता हरप्रितसिंघ त्यांच्या घरासमोर खुली तलवार घेवून त्यांच्या बहिणीच्या अंगावर आला. बहिणीला मार लागेल या भितीने लखमिरसिंघने तिला वाचविण्यासाठी प्रयत्न केला तेंव्हा हरप्रितसिंघने डोक्याचा निशाना घेवून मारलेली तलवार त्यांच्या डाव्या खांद्याच्या पाठीमागील बाजूस लागली आणि त्यांना गंभीर जखम झाली. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 168/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 307 आणि 4/25 भारतीय हत्यार कायद्यानुसार दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सौमित्रा मुंडे ह्या करीत आहेत.
उधारीचे पैसे परत मागितले म्हणून जीवघेणा हल्ला