नांदेड(प्रतिनिधी)-वाळू वाहतुक महसुल कायद्यानुसार रात्रीच्या अंधारात बंद असतांना सुध्दा ती रात्रीच्या अंधारातच सुरू असते. हे काल दि.10 जून रोजी रात्री 11.30 वाजता घेतलेल्या एका छायाचित्रावरुन पुन्हा एकदा स्पष्टच झाले.
अवैध रेती उत्खनन आणि अवैध वाळूची वाहतुक अनेकांनी झटल्यानंतर सुध्दा बंद होतच नाही. कागदोपत्री अभिलेख तयार केला जातो. वाळू माफियांवर केलेल्या कार्यवाहीचा पण वाळू माफियांचे काम कधीच बंद पडले नाही. काल दि.10 जूनच्या रात्री 11.30 वाजेच्यासुमारास श्रीनगरकडून आयडीआयकडे येणाऱ्या रस्त्यावर एक वाळूने भरलेला टीपर सुसाट वेगात धावत होतो. रस्त्यावर गर्दी नाही कोणी थांबवून तपासणी करणार नाही म्हणून वाळू टिपर चालकाचा सुसाट वेग समजू शकतो.
महसुल अधिनियम असे सांगतो की, सुर्यास्त झाल्यानंतर सुर्योदय होण्यापुर्वी वाळूची वाहतूक करताच येत नाही. तरीपण अवैध वाळूची वाहतुक रात्रीच्या गर्द अंधरात अव्याहतपणे सुरू आहे. रात्रीला प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करणारी पोलीस मंडळी फिरत असतात त्यांच्या नजरेतून सुध्दा ही अवैध वाळूची वाहतुक कशी सुटते हे न उलगडणारे कोडे आहे. पोलीस विभागातील व्यक्ती हे महसुल विभागाचे काम आहे असे सहज उत्तर देवून आपली जबाबदारी झटकण्यात माहीरच असतात.अशा प्रकारे ही अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या अंधारात सुरू आहे.
अधिकाऱ्यांना अंधारात वाळूची गाडी दिसत नाही ?