वसमत (प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी,पुणे यांच्यामार्फत जागतिक पर्यावरण दिना निमित्त संपूर्ण राज्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.
तालुक्यातील समता दूता मार्फत प्रत्येक जिल्ह्यात, खेडोपाड्यात, प्रशासकीय कार्यालयात वृक्षारोपण साजरा करण्यात येत आहे की दिनांक 05 जून ते दिनांक 20 जून पर्यंत वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीचे महासंचालक यांच्या आदेशान्वे हिंगोली जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोंवदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विभागामध्ये वृक्षारोपण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज दिनांक 11 जून 2021 रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनचे स.पोलीस निरीक्षक व्हि. एस.चवळी यांच्या हस्ते वसमत तालुका समतादुत मिलींद आळणे व गुरूनाथ गाडेकर यांनी उपस्थित राहुन वृक्षारोपण केले.चवळी यांनी वृक्ष लावुन पुर्णपणे जगतील अशी खात्री देवुन या उपक्रमाचे कौतुक केले.या प्रंसगी ग्रामिण पोलीस स्टेशन मधील पोलीस उप निरीक्षक डि.पी.शिंदे,स.पो.उ.नि, बी.एम कुमरे,जे.व-हाडे,एस.ए चव्हाण यांच्या उपस्थित वृक्षारोपण करण्यात आले.
समता दूतामार्फत आज वसमत पोलीस ठाणे येथे वृक्षारोपण