नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाणे शिवाजीनगर, इतवारा, विमानतळ येथे विविध चोऱ्या करणाऱ्या चार जणांना नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी हे सर्व आरोपी आणि त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल संबंधीत पोलीस ठाण्याला देण्यात आला आहे.
पोलीस खात्यातील जनसंपर्क विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार 16 मे रोजी नवनाथ भारती यास मराठा बार जवळ तलवारीचा धाक दाखवून 700 रुपये रोख रक्कम आणि एक मोबाईल चोऱ्याण्यात आला होता. 5 जून रोजी पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत सकोजीनगर येथे मुन्ना ठाकूरला पिस्तुलचा धाक दाखवून त्यांचा बकरा बळजबरीने चोरण्यात आला होता. 4 जून रोजी चौफाळा भागातील बजरंग बाबूराव जोंधळे हे घरात झोपले असतांना त्यांच्या घरातील मोबाईल चोऱ्यात आला होता. 7 जून रोजी मोहम्मद मोईन कुरेशी यांची दुचाकी गाडी चोरीला गेली होती.
या गुन्ह्यांच्या संदर्भाने समांतर तपास करतांना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या सर्व चोऱ्या करण्यामध्ये तेजपालसिंघ कुलवंतसिंघ चाहेल (28) रा.जुना कौठा, सुरजसिंह कल्याणसिंह ठाकूर (30) रा.चिरागल्ली नांदेड, शेख जुबेर शेख कदीर (19) रा.वाजेगाव आणि शोयब खान शब्बीर खान (20) रा.वाजेगाव या चौघांचा सहभाग होता. हे सर्व चोरटे वाजेगाव परिसरात असल्याची खबर मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने त्यांना पकडले. चोरट्यांनी वर उल्लेखीत केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी चोरट्यांना पकडणाऱ्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, आशिष बोराटे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार सलीम बेग, जसवंतसिंघ शाहु, मारोती तेलंगे, बालाजी तेलंग, रवि दासरवाड, विलास कदम, गणेश धुमाळ, विठ्ठल शेळके, हेमंत बिचकेवार, मोतीराम पवार, तानाजी येळगे, कलीम आणि सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेच्या सक्षम पोलीस निरिक्षकांनी चार चोरटे पकडले