अखिल भारतीय यादव महासभेची मागणी
नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द न होता अबाधीत राहिलेच पाहिजे या मागणीसाठी ऑल इंडिया यादव महासभेने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नांदेड येथील गवळी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यावतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण रद्द न करता ते अबाधीतच राहिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी ऑल इंडिया यादव महासभेचे राष्ट्रीय महासचिव किशन यादव, प्रज्ञा जागृती मिशनचे कार्याध्यक्ष डॉ.कैलास भा.यादव, माजी नगरसेवक किशोर यादव, इलेक्ट्रानिक मिडीयाचे कुवरचंद मंडले यांच्यासह गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन यादव, शहराध्यक्ष धिरज यादव, डॉ.संतोष यादव, ऍड. इंदर यादव, लक्ष्मण प्रतिष्ठाणचे राधाकिशन यादव, भारतभूषण यादव, लालचंद बटावाले, राज यादव, विजय यादव, गोकुळ यादव, स्वराज यादव आदींची उपस्थिती होती.
