नांदेड(प्रतिनिधी)-पदव्युत्तर शिक्षणाचे खोटे गुणपत्रक व खोटे शिक्षणपुर्ण प्रमाणपत्र बनवणाऱ्या एका युवकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांनी या युवकाच अटक केली आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ.रवि निवृत्तीराव सरोदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जून रोजी दुपारी 12 वाजता जका उल्ला खान साबीर खान रा.यवदा ता.दर्यापुर जि.अमरावती आणि अनसार सर रा.माना ता.मुर्तीजापूर जि.अकोला या दोघांनी संगणमत करून स्वत:चे एम.ए.ईतिहास व भुगोल विषयाचे बनावट गुणपत्रक आणि एम.ए.शिक्षण पुर्ण केल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करून त्याच्या भावाच्यासाठी शैक्षणिक फायदा उचलण्याच्या उद्देशाने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची आणि शासनाची फसवणूक केली आहे. या गुणपत्रकांची पडताळणी करतांना ही बाब लक्षात आली.
डॉ.रवि सरोदे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 396/2021 कलम 420,468, 469 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शेख जावेद हे करीत आहेत. या प्रकरणातील जका उल्ला खान साबीर खान यास नांदेड ग्रामीण पोलीसांनी रात्रीच अटक केली आहे.
खोटे शैक्षणिक गुणपत्रक बनवणाऱ्या एकाला अटक