नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका दुचाकी चोरट्याला पकडून एक दुचाकी जप्त केली आहे.
पोलीस सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सुदर्शन सखाराम अप्पा एकलिंगे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.21 ए.वाय.3258 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 15 जून रोजी सोमेश कॉलनी नांदेड येथून चोरीला गेली होती. या बाबतचा गुन्हा 16 जून रोजी दाखल झाला होता.
वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार संतोष बेल्लुरोड, चंद्रकांत बिरादार, शेख इम्रान आदी 17 जून रोजी रात्री गस्त करत असतांना उस्मानशाही मिल शाळेच्या मोकळ्या मैदानात ही चोरीला गेलेली गाडी त्यांना एका युवकाच्या ताब्यात दिसली. पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेवून विचारणा केली असता त्याचे नाव राहुल लालबा नवघडे (21) रा.देगावचाळ असे आहे. पोलीसांनी दुचाकी गाडीसह चोरट्याला अटक केली आहे. पोलीस अंमलदार संजय जाधव या बाबतची न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करणार आहेत.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख, पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोर पकडला