विष्णुपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला ;471 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग

नांदेड(प्रतिनिधी)-यंदाचा पावसाळा सुरू झाल्याबरोबर एका आठवड्यात विष्णुपूरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार विष्णुपूरी धरणातील एक दरवाजा उघडण्यात आला असून त्यातून 471 क्युमेक्स पाणी सोडले जात आहे.
विष्णुपूरी धरणात मागील वर्षी शिल्लक राहिलेल्या पाणी साठ्याच्या परिणामात यंदाचा पावसाळा सुरू होताच पहिल्या आठ दिवसात विष्णुपूरी धरण 94 टक्के भरले. त्यावेळी विष्णुपूरी धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. शहराला पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी विष्णुपूरी धरणावर आहे. तरीपण महानगरपालिकेने आता कुठे दोन दिवसाआड शहराला पाणी सोडले जाईल अशी घोषणा केली आहे. मग विष्णुपूरी धरणात भरपूर पाणी साठा असतांना नागरीकांवर तीन दिवसाला आड पाणी देण्याची नामुष्की महानगरपालिकेने का केली याचे उत्तर कोणीच देत नाही.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार 18 जून रोजी विष्णुपूरी धरणाचे पाणी 100 टक्के भरल्याने त्यातील एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यातून 471 क्युमेक्स असा पाणी साठा विसर्जित केल्या जात आहे. या पुढे जास्त पाणी साठा विसर्जित केला गेला तर गोदावरी नदीच्या काठी राहणाऱ्या नागरीकांना सावधान राहण्याची गरज आहे.
विष्णुपूरी धरणातील पाणी साठा सोडला जात असल्याने ज्या ठिकाणी वाळू जमते त्या जागी पुन्हा वाळू भरेल आणि वाळु माफियांना अवैध उत्खनन करण्यासाठी वाळू तयार मिळेल हा सुध्दा चांगल्या पावसाचा आणि विष्णुपूरी धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याचा चांगला परिणाम आहे. जेणे करून अवैध रेतीवर आपले उर्दहनिर्वाह भागविणाऱ्या गरजवंत लोकांना अवैध वाळू उत्खननासाठी सर्व कांही तयार मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *