युवक काँग्रेसचे महासचिव उमाकांत सरोदे यांचा उपक्रम.
अर्धापूर (प्रतिनिधी.) आखिल भारतीय काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव उमाकांत सोनाजी सरोदे यांच्या वतिने अर्धापूर शहरातील व तालुक्यातील पत्रकारांना दि.१९ शनिवारी रोजी छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

शहरातील पंडितराव लंगडे यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकारांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मागासवर्गीय सेलचे माजी तालुकाध्यक्ष सोनाजी सरोदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष प्रतिनिधी शेख लायक,पंडितराव लंगडे,जिल्हा सचिव निळकंठ मदने,
नगरसेवक इम्रान सिध्दीकी, व्यंकटी राऊत,महमंद सुलतान,माजी सरपंच शंकर ढगे,नवनाथ ढगे,मारोती कांबळे आदी उपस्थित होते.युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव उमाकांत सरोदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी पत्रकार लक्ष्मीकांत मुळे,ओमप्रकाश पत्रे,नागोराव भांगे पाटील,गुणवंत विरकर,रामराव भालेराव,गोविंद टेकाळे,आजित गट्टाणी,शेख जुबेर,ईरफान पठाण, युनूस नदाफ,अँड.गौरव सरोदे,काजी मुख्तारोद्दिन आदी पत्रकारांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले.