एकूण 5 चोऱ्यांमध्ये 3 लाख 18 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकाजवळ एका हॉटेलसमोर थांबलेल्या कारमधील 1 लाख 76 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिणे घेवून चोरट्यांनी पळ काढला आहे. मनाठा जवळच्या रोडगी गावात एक घरफोडून चोरट्यांनी 67 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. माळाकोळी, धर्माबाद, किनवट या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येक अशा 3 दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. नांदेडच्या हडको भागातून एक मोबाईल चोरीला गेला आहे.
अक्षय सुर्यकांत पत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जून रोजी रात्री 11.30 वाजता छत्रपती चौकातील हॉटेल ग्रॅंड मराठा या हॉटेलमध्ये त्यांची बहिण अश्र्विनी बिडवे रा.बार्शी या लग्नासाठी आल्याअसतांना थांबल्या होत्या. त्यांची कारमध्ये ठेवलेली एक हॅन्ड बॅग ज्यामध्ये 5 तोळ्याचे गंठन 1 लाख 75 हजार रुपयांचे आणि 1200 रुपये रोख रक्कम ठेवलेले होते. ही 1 लाख 76 हजार 200 रुपये ऐवज ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळवली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक प्रशांत जाधव अधिक तपास करीत आहेत.
भुजंगराव इरबाजी कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 जूनच्या रात्री 11 ते 21 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान त्यांचे रोडगी येथील घरात ते झोपले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचे आणि त्यांच्या शेजारी असलेल्या घराचे गेट तोडून आत प्रवेश केला आणि दोघांच्या येथून 60 हजार 600 रुपयांचा ऐवज रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे या स्वरुपाचा चोरून नेला आहे. मनाठा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार तिडके हे करीत आहेत.
अर्जुन बळीराम घुगे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26बी.बी.8203 ही 18 जून रोजी रात्री 9.30 ते 19 जूनच्या पहाटे दरम्यान चोरीला गेली आहे. हा प्रकार माळाकोळी-कंधार रस्त्यावर घडला. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. माळाकोळी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार किरपणे हे करीत आहेत.
साईनाथ गंगाराम पुराण यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.जी.0482 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी 18 जूनच्या रात्री 10 ते 19 जूनच्या पहाटे 5 वाजेदरम्यान रेल्वे स्टेशन तांडा धानोरा (खु) येथून चोरी झाली आहे. धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
सुधाकर पुरूषोत्तम पंचरवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 यु.7049 ही कृषी उत्पन्न बाजार समिती गोकुंदा ता.किनवट येथून 18 जून ते 19 जूनच्या रात्रीला चोरी गेली आहे. या गाडीची किंमत 15 हजार रुपये आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
उमेश धोंडीराम गायकवाड हे 20 जूनच्या सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास हडको येथील आठवडी बाजारामध्ये खरेदी करत असतांना त्यांचा 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल कोणी तरी चोरला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांीन हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार साखरे अधिक तपास करीत आहेत.
कारमधून 1 लाख 76 हजारांचा ऐवज लंपास