नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा ऑलम्पिक असोसिएशनच्यावतीने 23 जून रोजी ऑलम्पिक दौड आयोजित करण्यात आली आहे. सोबतच 23 जूनच्या 29 जून दरम्यान ऑलम्पिक क्रिडा सप्ताहचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे महासचिव बालाजी जोगदंड यांनी प्रसिध्द पत्रक पाठवून दिले आहे.
नांदेड जिल्हा ऑलम्पिक असोसिएशनने काढलेल्या प्रसिध्दी पत्रकात 23 जून रोजी अंतराष्ट्रीय ऑलम्पिक दिनानिमित्त जगभरात ऑलम्पिक क्रिडा सप्ताहचे आयोजन होत असते. याच पार्श्र्वभूमीवर नांदेडमध्ये सुध्दा 23 जून रोजी सकाळी 7 वाजता ऑलम्पिक दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.विपीन हे करणार आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, डॉ.हसंराज वैद्य आणि क्रिडा अधिकारी राजेश्वर मारावार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
या क्रिडा सप्ताहात तायक्वॉंदो संघटनेच्यावतीने अशोकनगर कॉलनीमध्ये मुलींसाठी व महिलांसाठी आणि कोरोना योध्दांच्या पाल्यांसाठी मोफत संरक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आर्चरी असोसिएशनच्यावतीने पाच दिवसांचे मोफत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोविड-19 च्या नियमावलीनुसार हे सर्व कार्यक्रम एक सप्ताहपर्यंत चालतील. सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 29 जून रोजी समारोप प्रसंगी प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.
ऑलम्पिक दौड आणि ऑलम्पिक सप्ताहातील कार्यक्रमात सहभागी होण्याचे आव्हान वृषाली पाटील जोगदंड, प्रा.जयपाल रेड्डी, डॉ.राहुल वाघमारे, प्रा.रविकुमार बकवाड, बाबूराव कंधारे, प्रलोभ कुलकर्णी, डॉ.रमेश नांदेडकर, डॉ.मनोज पैंजणे, डॉ.जयदीप कहाळेकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जर्नाधन गुपिले. लक्ष्मण फुलारी, संतोष सोनसळे, बळीराम लाड, विक्रांत खेडकर, राम बैनवाड, क्रिडाधिकारी किशोर पाठक, गुरदिपसिंघ संधू, प्रदीप कुपटीकर यांनी केले आहे.
23 जून ते 29 जुन दरम्यान ऑलम्पिक क्रिडा सप्ताहचे आयोजन