नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर शहरातील महंमद जाकेर अणि त्याच्या कुटूंबियांनी एका 52 वर्षीय व्यक्तीला जुन्या भांडणाच्या कारणावरुन हाताील काठी, गजाळीने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
महंमद शमीम महंमद अजमतुल्ला (52) रा.नईअबादी अर्धापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता देळूब शिवारातील आपल्या शेत गट क्रमांक 234 मध्ये ते काम करत असतांना मागील भांडणाच्या कारणावरुन महंमद जाकेर आणि त्याच्या नातलगांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांना आणि त्यांच्या मुलाला हातातील काठी, गजाळीच्या सहाय्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत महंमद शमीम यांच्या डाव्या पायातील गुडघ्याला फॅक्चर झाला आहे. महंम्मद शमीम यांनी लिहिलेल्या चार आरोपींमध्ये महंमद जाकेर महंमद तसलीम, महंमद जाबेर महंमद तसलीम,महंमद जुबेर महंमद तसलीम आणि महंमद तसलीम महंमद अजमतुल्ला यांची नावे आहेत. या गुन्ह्याची तक्रार आपला वैद्यकीय उपचार करून दिली आहे असे तक्रारीत लिहिले आहे. अर्धापूर पोलीसांनी या तक्ररीनुसार गुन्हा क्रमांक 157/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 325, 323, 504, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार तुकाराम बोईनवाड हे करीत आहेत.
अर्धापूरच्या जाकेर आणि त्याच्या कुटूंबियांनी 52 वर्षीय माणसाला मारहाण केली