मुखेड तालुक्यात चंदन तस्करी वाढली, सुगाव (बु) शिवार मांजरी येथील शेतकऱ्यांच्या चंदन झाडाची चोरी

 

मुखेड( प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील सुगाव (बु) शिवार मांजरी येथील शेतकरी श्रीपत संभाजी पाटील यांच्या शेतजमीनितील गट क्र.15 येथील शेतीजमीनीमधुन चंदन झाडाची मशीन ने कत्तल करून चंदन तस्करानी चंदन झाडाची चोरी केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, चंदन तस्कारानी चंदनाची झाडे मोठे होण्यास अजुन वाव असताना चंदन तस्करानी अगोदरच झाडे झाड कापना-या मशिन ने कापुन नेले आहेत. कांही प्रमाणात शेतकरी तक्रारी करत नाहीत मी ही यापूर्वी तक्रार केलो नाही पण गेल्या महिन्यात एका तस्कर टोळीने चंदनाचे झाड विका नाही तर कोनी चोरून नेतात असे म्हणुन घरी येऊन कल्पना देली होती. कल्पना देना-यास सुचना केलो होतो.की झाड अजून मोठे होण्यास वाव आहे पुर्ण मोठे झाल्यावर बघु पण कालच ते चंदन तस्करांनी झाडच चोरून नेले.तालुक्यात मात्र चंदन तस्कराची एक टोळी सक्रिय झाल्याचे मात्र दिसुन येत आहेत. यापुढे चालुन चंदन तस्कर हे असे पुन्हा क्रत्य करू नये म्हणून यासाठी त्यांचा बंदोबस्त करणे आता जिकीरीचे झाले आहे.असेही वनपरिक्षेत्र अधिकारी(रेंजर ) कार्यालय मुखेड यांना दिलेल्या निवेदनात शेतक-यानी म्हणाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *