नांदेड(प्रतिनिधी)-सजा(स्टुडंन्ट जस्टीस असोसिएशन) संघटनेने आज राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करतांना छत्रपती शाहु महाराजांनी दिलेल्या शिकवणीला अंमलात आणण्याचे मनोमन ठसवून राजर्षी शाहु महाराजांना अभिवादन केले.
आरक्षणाचे प्रणेते, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, लोकराजे, छत्रपती शाहु महाराज यांच्या 147 व्या जयंती निमित्त सजा (स्टुडंन्ट जस्टीस असोसिएशन)संघटनेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सजाचे प्रमुख धम्मा वाढवे, व्यंकटेश राठोड, अक्षय कांबळे, मनोहर सोनकांबळे, शुभम दिग्रसकर, किरण भिसे, गोपाळ वाघमारे, विष्णु बारसे, लोकेश सातोरे, श्रीकांत गाढे, मारोती बरमे, दिनेश येरेकर, सुजय पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सजा संघटनेने शाहु राजांना केले अभिवादन