धर्माबाद तालुक्यात 1 लाख 15 हजारांची मुरा म्हैस चोरीला गेली

इतर चोऱ्यांमध्ये एकूण 1 लाख 13 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड (प्रतिनिधी)- पाटोदा खु. ता.धर्माबाद येथून 1 लाख 15 हजार रूपये किंमतीची मुरा म्हैस चोरीला गेली आहे. 24 तासांत चोऱ्या झालेल्या विविध प्रकरणांमध्ये 2 लाख 28 हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. काल दि. 26 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास एका महिलेचे गंठन तोडले होते. त्याची किंमत तक्रारीमध्ये 33 हजार रूपये आहे.
रेखा सुरेश इंगोले या आपल्या पतीसोबत मोटारसायकलवर बसून 26 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास खडकपूरा पाण्याच्या टाकीसमोरून येत असताना त्यांच्या गळ्यातील गंठन चोरट्यांनी चोरून नेले. पोलिसांनी लिहिल्याप्रमाणे 3 तोळे सोन्याचा तो हार आणि त्याची किंमत 33 हजार रूपये लिहिली आहे. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक उत्तम वरपडे अधिक तपास करीत आहेत.
दिनेश जयराम राखेवार यांची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 डब्ल्यू 1423 ही 50 हजार रूपये किंमतीची गाडी 25 जून रोजी सायंकाळी 5.30 ते रात्री 10.30 या वेळेदरम्यान रेल्वेस्थानकासमोरून चोरीला गेली आहे. वजिराबाद पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अरूण श्यामराव उंडेगावकर यांची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 ए.एम. 0524 ही 30 हजार रूपये किंमतीची गाडी 25 जून ते 26 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान जीवनकला मंदिर साईराम नगर जुना कौठा नांदेड येथून चोरीला गेली. या गाडीची किंमत 30 हजार रूपये आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस उपनिरीक्षक गिते अधिक तपास करीत आहेत.
श्यामराव केरबा चव्हाण यांनी 24 जून रोजी रात्री 10 वाजता आपल्या पाटोदा खु. ता.धर्माबाद येथील आखाड्यावर आपली मुरा जातीची 1 लाख 15 हजार रूपये किंमतीची म्हैस बांधली होती. 25 जूनच्या सकाळी 6 वाजता ही म्हैस चोरीला गेलेली दिसली. धर्माबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.सहायक पोलीस उपनिरीक्षक ढवळे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *