नांदेड (प्रतिनिधी)- देगलूरमध्ये एका वयस्कर व्यक्तीला त्याची नजर चुकवून सोन्याची अंगठी, सोन्याचे लॉकेट असे 25 ग्रॅम किंमतीचे सोने 1 लाख 12 हजार 500 रूपयांचे एका ठकसेनाने लंपास केले आहे.
दीपक जगदीश लोहिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 26 जून रोजी सकाळी 8 वाजता नगरेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या त्यांच्या घरासमोरच्या ओठ्यावर त्यांचे वडील बसलेले होते. एका अनोळखी सावकारासोबत आलेल्या आणि त्यांच्या ओळखीच्या नसलेल्या माणसाने देणगी देण्याचा बहाना करत त्यांच्या वडिलांच्या हातातील अंगठी व लॉकेट असे 25 ग्रॅम सोन्याचे साहित्या ज्याची किंमत 1 लाख 12 हजार 500 रूपये आहे, ते नजर चुकवून कॅरिबॅगमध्ये टाकण्यासारखे करून फसवणूक करून चोरी करून नेले आहे. या प्रकरणी देगलूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पुनम सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
वयस्कर व्यक्तीचे 1 लाख 12 हजारांचे दागिने फसवणूक करून लंपास केले