नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.27 जून रोजी नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या शासकीय निवासस्थानात सापडलेला नाग जातीचा साप पोलीस अंमलदार दत्ता गायकवाड आणि महिले बरबडेकर यांनी जीवंत पकडून त्याला निर्मुष्य ठिकाणी सोडले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दि.27 जून रोजी पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या शासकीय निवासस्थानात एक साप फिरतांना दिसला. पोलीस दलातील पोलीस अंमलदार दत्ता गायकवाड (बकल नंबर 1460) यांना बोलावण्यात आले. त्यांनी आपले सहकारी महेश बरबडेकर यांच्यासोबत हा चार फुट लांब नाग जातीचा साप अत्यंत पध्दतशिरपणे पकडला आणि त्या सापाला एका निर्मुष्य ठिकाणी नेऊन सोडण्यात आले.
नांदेडमध्ये कोठेही साप निघाला तर त्याला मारुन टाकू नका, सर्पमित्रांना बोलवा. जेणेकरून मानवांच्या वस्तीत आलेल्या सापाला पुन्हा त्यांच्या नैसर्गिक ठिकाणी नेऊन सोडण्यात येईल. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा वेळेस सापांचे निवासस्थान पाण्याने भरते आणि म्हणून ते बाहेर येतात त्यामुळे घाबरून न जाता त्या सापांना योग्य ठिकाणी सोडण्यासाठी सर्पमित्रांची मदत घ्यावी आणि त्या सापांचे जीवन वाचवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पोलीस अधिक्षकांच्या शासकीय निवासस्थानात आलेला नाग पोलीस अंमलदाराने पकडून पर्यावरणाचे रक्षण केले