मंगळवारी आनंदची खबर आली; एकही रुग्ण कोरोना बाधीत सापडला नाही
नांदेड,(प्रतिनिधी)- मंगळवारी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही हि अत्यंत आनंदाची बातमी आली आहे.आज कोरोना बाधेतून मुक्त होणारे रुग्ण ०९ आहे.आज बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९७.११ आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक २९ जून रोजी एकाही रुग्णाचा कोरोना बाधेने मृत्यू झाल्याची नोंद नाही.तसेच एकही नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडला नाही.
मनपा अंतर्गत विलगीकरण व जम्बो कोवीड सेंटर – ०२ ,मुखेड – ०३, देगलूर -०१,अर्धापूर-०२,हिमायतनगर-०१, अश्या एकूण ०९ रुग्णांना उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८८५९७ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.११ टक्के आहे.
आज प्राप्त झालेल्या १४९२ अहवालांमधील १४७६ अहवाल निगेटीव्ह आहेत, ०० अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या ९१२३१ एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ०० आणि अँटीजेन तपासणीमध्ये ०० असे एकूण ०० रुग्ण आहेत.आजच्या ०० रुग्णांमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात ०० रुग्ण आहेत. आज स्वॅब तपासणी ८६ अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब १६ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत.
आज कोरोनाचे १३८ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी -०७, जिल्हा रुग्णालय-२१, किनवट-०२, मुखेड-०४, देगलूर -०२,नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -५१, नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -४९, खाजगी रुग्णालय-०२, असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात ०४ रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी -१२४, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल -१२९