नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर शहरातील तामसा, कॉर्नर येथील एसबीआयचे एटीएम गॅस कटरने फोडून त्यातील 31 लाख 7 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहेत.
स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा अर्धापूरचे व्यवस्थापक सुनिल आनंदराव घुगूल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.29 जूनच्या रात्री 3.30 ते 3.40 अशा फक्त 10 मिनिटात अर्धापूर शहरातील तामसा कॉर्नर येथे असलेले एटीएम मशीन चोट्यांनी गॅस कटरने कापून त्यातील 31 लाख 7 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. या या सर्व नोटा 500 रुपये दराच्या असून त्यांची संख्या 6214 एवढी आहे. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांचे पथक सुध्दा कार्यरत आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एका चार चाकी गाडीमध्ये हे चोरटे आले होते आणि त्यांनी त्यातच गॅस कटर आणून हा प्रकार केला आहे. पोलीस या संदर्भाने अर्धापूरसह अर्धापूरकडे येणाऱ्या आणि अर्धापूरहून दुसरीकडे जाणाऱ्या गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
अर्धापूर शहरात गॅस कटरने एटीएम कापून 31 लाख रुपये चोरले