उमरी(प्रतिनिधी) – उमरी शहरातील लोकांना दोन्ही बायपास रस्त्याचा मुळीच फायदा होणार नसून काँग्रेसवाले स्वाताच्या स्वार्थासाठी सोयीचे राजकारण करीत आहेत त्यामुळे उमरी शहरा बाहेरील दोन्ही बायपास रस्त्याचे बांधकाम थांबविण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरु असा ईशारा माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांनी दिला आहे
कोहीनूर टाकीज येथे व्यापारी, नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली यावेळी माजी आ.गोरठेकर बोलत होते
पुढे बोलताना गोरठेकर म्हणाले की नगरपरिषद जिल्हा परिषद निवडणूका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसवाले उमरीच्या राजकारणात ढवळा ढवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु विरोधकांचा डाव यशस्वी होवू देणार नाही असा खणखणीत ईशारा माजी आ.बापुसाहेब गोरठेकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांना दिला आहे
यावेळी गटनेता प्रवीण बाबूराजा सारडा,उपसभापती शिरिषराव देशमुख गोरठेकर, आनंदराव यलमगौडे, सुभाषराव देशमुख गोरठेकर,विक्रम देशमुख, कैलासराव देशमुख गोरठेकर,संतोष मुकावार,नरसींग चिटमलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धिरज दर्डा,नरसिंग मुकावार,विष्णू पंडीत, अनिल दर्डा, बालाजी येरावार, सदानंद खांडरे, माजी नगरसेवक गजानन श्रीरामवार, साईनाथ जमदाडे, भगवान मुदीराज, डॉ.अग्रवाल,राजेश जाधव,यासह असंख्य व्यापारी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते
उमरी शहरा बाहेरील दोन्ही बायपास रस्त्यासाठी रस्त्यावर उतरु – माजी आ. बापुसाहेब गोरठेकर