नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड येथे बसमध्ये बसलेल्या एका 65 वर्षीय महिलेचे दोन लाख रुपये तीन महिलांनी चालत्या बसमध्ये चोरून एका गावात उतरुन दुसरीकडे गेले आहेत.
सौ.प्रभावती भुजंगराव राठोड (65) ह्या आपल्या पतीसोबत नांदेड ते मुखेडकडे जाणाऱ्या एस.टी.बस क्रमांक एम.एच.20 बी.एल.4003 मध्ये बसून प्रवास करत होत्या. या बसमध्ये काकांडी ते मारतळा दरम्यान 30 ते 35 वर्ष वयोगटाच्या तीन अनोळखी महिला पण प्रवाशी झाल्या. त्यांनी त्या महिलेच्या शेजारच्या सीटवर बसून त्यांच्याकडील पिशवीमध्ये असलेले 2 लाख रुपये काढून घेतले. त्या नोटांमध्ये 500 रुपये दरांचे दोन बंडल आणि 200 रुपये दराचे 5 बंड असे 7 बंडल होते. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार या तीन अनोळखी महिलांनीच ही चोरी करुन मुखेडच्या अगोदर येणाऱ्या गडगा या गावात उतरून गेल्या आहेत. हा प्रकार 29 जूनच्या सकाळी 9.30 ते 11 वाजेदरम्यान घडला आहे. या संदर्भाने मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
चालत्या बसमध्ये तीन महिलांनी 2 लाख रुपये चोरले