नांदेड(प्रतिनिधी)-बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून चॉईल्ड लाईनच्यावतीने आयोजित चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या बालकांना जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी बक्षीस देवून त्यांचा सन्मान केला.

12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने दोन गटांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एक गट 6 ते 12 वयोगटाचा आणि दुसरा गट 12 ते 18 वर्ष वयोगटाचा आहे. नांदेड चाईल्ड लाईनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत वेदांत पुदरोड, स्वाती दयानंद वाघमारे, किरण दिलीप भालेराव या तिघांनी मोठ्या गटात यश प्राप्त केले. स्नेहा विठ्ठल दाजी सुरेंद्र राजेंद्र कदम, अनामिका धोंडीबा वाघमारे, आर्या विनय नाईक, शेख अफरीन तौफिक यांनी छोट्या गटात विजय संपादन केला.
जिल्हाधिकारी डॉ.विपीन, मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी राम गगराणी, परिवार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.डी. जोशी पाटोदेकर, बाल विकास अधिकारी रेखा काळम, बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, केंद्र समन्वयक बालाजी आलेवार यांनी विजेत्या स्पर्धक बालकांना अभिनंदन केले आहे. या चित्रकला स्पर्धेचा विषय बाल कामगार मुले हा होता.
