नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून एका 42 वर्षीय माणसाने आत्महत्या केल्यानंतर खळबळ माजली आहे. तहसील कार्यालयाच्या इमारतीवर दोरीने लटकलेला त्याचा मृतदेह दिसत होता.

आज दि.3 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्यासुमारास लोहा येथील मुख्य रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांनी तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून पहिल्यामजल्यावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहिला. लोहाचे पोलीस निरिक्षक संतोष तांबे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार त्वरीत घटनास्थळी पोहचले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उमरा तालुका लोहा येथील राहणारे भिमराव चंपती शिरसाट (42) यांनी स्वत:ची मान दोरीमध्ये लटकवून तहसील कार्यालयाच्या गच्चीवरून लटकवून घेतले आहे. त्यांचा मृतदेह पहिल्या मजल्याच्या छज्जापर्यंत लटकलेला दिसत आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे संतोष तांबे यांनी सांगितले.
