नांदेड(प्रतिनिधी)- आज वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने एक मोटारसायकल चोरटा पकडला आहे. त्याने ही मोटारसायकल तामसा येथून चोरली आहे.
4 जुलै रोजी वजिराबादचे पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, विजय नंदे, संतोष बेल्लूरोड हे सर्व आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असतांना दवाखाना समोर त्यांना एक युवक दिसला. त्याच्याकडे नंबर नसलेली दुचाकी गाडी होती. पोलीसांनी मोटारसायकलच्या नंबर का नाही याची विचारणा केली तेंव्हा तो समाधान कारक उत्तर देत नव्हता. पोलीसांनी या गाडीची माहिती जमा केली तेंव्हा तामसा पोलीस ठाण्याच्या अभिलेखात गुन्हा क्रमांक 120/2021 या दुचाकी चोरी प्रकरणाने दाखल होता. पोलीसांनी चोरलेली दुचाकी बाळगणाऱ्या प्रविण बबन थोरात (20) रा.जयभीमनगर नांदेड यास तामसा येथील पोलीस उपनिरिक्षक लघुरामजी घुगे आणि पोलीस अंमलदार शिवाजी हडसुळ यांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.