अन्न व औषधी प्रशासनाला फे्रंडर्स जर्दा स्टोअरचे गोडाऊन सापडले मात्र 40 फुटावर असलेल्या फे्रंडर्स एजन्सीचे गोडाऊन त्यांना कळलेच नाही

नांदेड(प्रतिनिधी)-जुना मोंढा भागातील फे्रंडर्स जर्दा स्टोअरवरच्या गोडाऊनवर  काल दि.5 जुलै रोजी अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे यांनी छापा टाकला. 40 फुटावरच असलेल्या फ्रेंडर्स एजन्सीचा गोडाऊन त्यांना भेटला नाही. फे्रंडर्स जर्दाच्या रियान सौदागरला अटक करण्यात आली आहे. जुना मोंढा ते वाजेगाव पर्यंत असंख्य गुटखा गोडाऊन आहेत. पंखे दुरूस्त करणारा आज सर्वात मोठा गुटखा माफिया आहे. त्याचा शोध कधी प्रविण काळे साहेबांना लागला नाही काय? अशा प्रकारे कायद्याच्या कक्षेत बसवून एकासाठी कायदा आणि दुसऱ्यासाठी कांही नाही असाच प्रकार सुरू आहे.
काल दि.5 जुलै दुपारनंतर अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  फे्रंडर्स जर्दा स्टोअरच्या गोडाऊन छापा मारला.  फे्रंडर्स जर्दा स्टोअरच्या 30 फुटानंतर त्यांचे गोडाऊन आहे. त्या गोडाऊनमध्ये जवळपास 3 लाख 13 हजार 270 रुपयांचा गुटखा पकडला. वेगवेगळ्या 16 नावाचे गुटखे त्यात सापडले. प्रविण काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीसांनी अब्दुल रियान सौदागर या मालकाविरुध्द गुन्हा क्रमांक 216/2021 दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक जमदाडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
नियुक्तीचा विहित कालावधी आणि त्यात नांदेडची माहिती एखाद्या संगणकाप्रमाणे आपल्या डोक्यात फिड ठेवणाऱ्या अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी प्रविण काळे याना  फे्रंडर्स जर्दा स्टोअरच्या गोडाऊनंतर 40 फुटावर असलेल्या  फे्रंडर्स एजन्सीचे दुकान आहे. या दुकानाचे गोडाऊन प्रविण काळे यांना कधीच कसे भेटले नाही. रियान सौदागरने कायद्याच्याविरुध्द केलेल्या कामाबद्दल त्याच्याविरुध्द दाखल झालेल्या गुन्हा ही एक कायदेशीर कार्यवाही आहे. कायदेशीर कार्यवाही ही फक्त रियान सौदागरसाठीच आहे काय? नांदेडमध्ये लोकांच्या घरा-घरात जाऊन पंखे दुरूस्त करणारा आज नांदेडचा सर्वात मोठा गुटखा किंग आहे. बस स्थानकाजवळ राहणारा दुसरा एक गुटखा किंग आहे ह्यांच्याबद्दल प्रविण काळे यांना कधीच गुप्त माहिती मिळाली नाही काय? या अनेक प्रश्नांसह महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केला गुटखा विक्री करणाऱ्या रियान सौदागरवर कार्यवाही करणारे अधिकारी श्रीमान प्रविणजी काळे यांचे अभिनंदनच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *