नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी कुंभारगल्ली येथे चालणाऱ्या एका मटका जुगार अड्यावर छापा टाकून तेथील लोकांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार मनोज बापूसिंह परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता कुंभारगल्लीमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला तेंव्हा तेथे कल्याण ओपन मिलन नावाचा मटका जुगार सुरू होता. तेथून रोख रक्कम आणि मटका जुकार चालविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी मटका चालविणारा बालाजी रुखमाजी कोंडावार (34) रा.विष्णुनगर नांदेड याच्यासोबत या भागाचा मटका किंग अनवर अली खान या दोघांची नावे आरोपी रकान्यात लिहिण्यात आली आहेत. वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 221/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार ढगे यांच्याकडे देण्यात आला आहे. या जुगार अड्यावरून 1520 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
वजिराबाद भागातील मटका किंगसह दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल