नांदेड(प्रतिनिधी)-शेतकरी मित्र फॉर्मर प्रोड्युसर कंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मोफत अर्ज भरून देण्याची सुविधा मालेगाव येथे कार्यान्वीत करण्यात आली आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी नेते तथा शेतकरी मित्र फॉर्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी नेहमीच काम करते. सर्व सीएस केंद्रांवर मोफत पिक विमा काढला पाहिजे. तेंव्हा केंद्र चालक शेतकऱ्यांकडून 100 ते 200 रुपये घेत असतात. आजच्या परिस्थितीत पिक विमा रक्कमेचा हप्ता भरणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. त्यासाठी शेतकरी मित्र कंपनीच्या सभासदांसाठी व इतर शेतकऱ्यांसाठी मोफत विमा काढून देण्याची सुविधा शेतकरी मित्रने मालेगाव येथे सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढला नाही अशांनी आवश्यक कागदपत्रे व जोखीम रक्कम घेवून शेतकरी मित्र कार्यालयात यावे व मोफत पिक विमा सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी मित्र कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केले आहे.
शेतकरी मित्र कंपनी शेतकऱ्यांचे पिक विमा अर्ज मोफत भरू देणार-प्रल्हाद इंगोले