नांदेड(प्रतिनिधी)- 7 जुलै रोजीच्या रात्री 4 तासाच्यावेळेस सोमेश कॉलनीमधील विश्र्व हॉस्पीटलच्या परिसरातून चोरट्यांनी 1 लाख 77 हजार 216 रुपयांची तांब्याची तार चोरली आहे. सोबतच 1 लाख 32 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
डॉ.उमेश मोहनराव भालेराव यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार विश्र्व हॉस्पीटलच्या पाठीमागील सुरक्षा भिंतीवरून कोणी तरी चोरांनी आत प्रवेश केला आणि ए.सी.पॅनल फोडून त्यातील 1 लाख 77 हजार 216 रुपयांची ताब्यांची तार चोरून नेली आहे. तोडफोड केल्यामुळे 1 लाख 42 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती