नांदेड (प्रतिनिधी), – पोेलीस उपमहानिरीक्षक कार्यालयाच्यावतीने दिलेल्या आलेल्या माहितीनुसार नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर अशा चार जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी विविध बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्यात आली. त्यात 36 लाख 53 हजार 44 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या मार्गदर्शनात नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, लातूरचे निखील इंगळे, परभणीचे जयंत मीणा, हिंगोलीचे प्रभारी पोलीस अधीक्षक यशवंत काळे, परभणीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, नांदेडचे निलेश मोरे, लातूरचे हिम्मतराव जाधव यांनी 9 जुलै रोजी आपल्या अखत्यारित मटका, जुगार, दारू, गांजा आणि गुटखा अशा पाच विविध बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कारवाई केली.
चार जिल्ह्यामध्ये मिळून झालेल्या कारवाई पुढील प्रमाणे आहे. मटका-65 (आरोपी 76), जुगार – 41 (121), दारू-257 (269), गांजा-2 (3), गुटखा-5 (16) या सर्व पाच कारवायांमध्ये एकूण 36 लाख 53 हजार 44 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
नांदेड शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशा कारवाया झाल्या. ज्यामध्ये अनेक ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये मटकाकिंगचे नाव सुद्धा जोडण्यात आले आहे.
नांदेड पोलीस परिक्षेत्रात एकाच दिवसात 36 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त