नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईलवर कॉल करून एका युवतीच्या बॅंक खात्यातून दोन वेळेस मिळून 39 हजार 992 रुपये लंपास केल्याचा प्रकार किनवट येथे घडला आहे.
कु.नेहा दिलीप मोटूपतलू कोंडूलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 जुलै रोजी दुपारी 4.30 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान ते आपल्या घरी असतांना त्यांना मोबाईल क्रमांक 18002084098 यावरून कॉल आला. तो काल 9883178843 या मोबाईलनंबरशी जोडला गेला. मित्रा कंपनीचा कर्मचारी बोलतोय असे सांगून त्या व्यक्तीने नेहाच्या एचडीएफसी बॅंक खात्यातून एकदा 24 हजार 996 रुपये आणि 14 हजार 996 रुपये दोनवेळा काढून घेतले. यामुळे नेहाची 39 हजार 992 रुपयांना फसवणूक झाली. किनवट पोलीसांनी हा गुन्हा 420 भारतीय दंडसंहितेच्या कलमानुसार क्रमांक 218/2021 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक राजकुमार भोळ हे करीत आहेत.
मोबाईलवर कॉल करून युवतीची 40 हजारांची फसवणूक