नांदेड(प्रतिनिधी)-अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या एका दुकानातून वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने 12 तलवारी, 3 कुकरी, 1 गुप्ती जप्त केली असून दुकान मालकाविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, गजानन किडे, संतोष बेल्लूरोड यांना ही माहिती देवून छापा टाकण्यास सांगितले. गुरूद्वारा रस्त्यावर एका दुकानात पोलीसांनी छापा मारला त्या ठिकाणी 12 तलवारी, 3 कुकरी, एक गुप्ती असे 7 हजार रुपये किंमतीचे विविध हत्यार जप्त करण्यात आले. प्रविण आगलावे यांच्या तक्रारीवरुन बेकायदेशीर रित्या शस्त्र विक्री करणाऱ्या मंजितसिंघ स्वरुपसिंघ सरदार (50)रा.अबचलनगर नांदेड यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी हत्यार पकडणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाने बेकायदेशीर विक्रीसाठी ठेवलेली 15 हत्यारे पकडली