उद्या राजाभाऊ ढाले यांच्यास्मृतीदिनी अभिवादन सभेचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-दलित पॅंथर, मास मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष प्रज्ञावंत योध्दा राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतीदिनी 16 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता सारनाथ विहार सावित्रीबाई फुलेनगर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पॅंथर चळवळीतील संस्थापक सदस्य राजाभाऊ ढाले यांचा 16 जुलै रोजी स्मृती दिन आहे. लिटल मॅगेजिन चळवळीला चेहरा प्राप्त करून देणारे, देशातील वंचित समाज घटकांवरील अत्याचाराचे उत्तर काळा स्वातंत्र दिनमधून देणारे प्रज्ञावंत योध्दा, दलित पॅंथरच्या झंझावात चेतवणारे राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतीदिनी 16 जुलै रोजी सायंकाळी 6.30 वाजता सारनाथ विहार, सावित्रीबाई फुलेनगर येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या अमोघ वकृत्वाने लाखोंच्या जनसभा जिंकणारे, साहित्याला खुले आंबेडकरी विचारधारेचा दृष्टीकोण देणारे, फुले आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, कवि, साहित्यक, अनुवादक, चित्रकार, समिक्षक आणि नवोदित साहित्यकांचे प्रेरणास्थान असलेल्या राजाभाऊ ढाले यांना अभिवादन करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती प्रा.राजू सोनसळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *