नांदेड(प्रतिनिधी)-हस्सापूर शिवारात रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली नाली भुखंडधारकांनी बंद केल्याने नालीतून जाणारे पाणी आता शेतात साचत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे निवेदन शिवसेनेचे नवनाथ काकडे यांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नांदेड यांच्याकडे दिले आहे.
नांदेड शहरानजीक असलेल्या हस्सापूर शिवारातील मौजे नसरतपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मागील अनेकपासून नाली तयार होती. त्यामुळे पाऊसाचे पाणी त्या नालीद्वारे वाहुन जायचे पण आता या भागात भुखंडांचा धंदा जोरात वाढल्यामुळे भुखंड धारकांनी नाली बंद करून रस्ते बंद केले आहेत. त्यावर शेड उभारले आहे. त्यामुळे नालीद्वारे वाहुन जाणारे पाणी आता शेतकऱ्यांच्या जमीनीत जमा होत आहे. शेतकऱ्यांचे या पाण्याच्या साठवणीने अतोनात नुकसान होत आहे. भुखंडधारकांना शेतकऱ्यांनी कांही सांगितले तर ते अरेरावीची भाषा वापरतात. या रस्त्याच्या कंत्राटदाराला कॉल केला तर तो सुध्दा टाळाटाळ करतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणीच ऐकून घ्यायला तयार नाही.
या ठिकाणी असलेली नाली पाणी वाहुन जाण्यासाठी मोकळी करून द्यावी असे निवेदन शिवसेनेचे नवनाथ काकडे यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार नांदेड यांना दिले आहे. शेतकऱ्यांच्या त्रासामुळे शेतकरी आत्महत्या करण्यासारखा कठोर निर्णय घेतील आणि त्याची सर्व जबाबदारी शासनावर राहिल असे या निवेदनात लिहिले आहे.
हस्सापूर शिवारातील भुखंड धारकांनी बंद केलेली नाली सुरू करून देण्यासाठी निवेदन