उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या सुचना
नांदेड (प्रतिनिधी)-वकीलांनी कोणताही वाद न्यायालयात दाखल करतांना वादाच्या शेवटी आपला ईमेल नंबर, व्हॉटसऍप मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती एम.जी.शेवलीकर यांनी दिले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक 509/2020 दाखल करण्यात आला. त्या याचिकेत महत्वाचा मुद्दा असा होता की, न्यायालयात सुरू असलेल्या वादाविषयीची माहिती वादीला देण्यात आली नाही. न्यायालयाने या प्रकरणातील वकीलांचे वकील पत्र पाहिले तेंव्हा त्यात त्यांचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दोन्हीही लिहिलेले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 जुलै रोजी सुनिश्चित करण्यात आली आहे.
न्यायालयासमक्ष आलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढील तारखेवर पाठवली असली तयार होणाऱ्या समस्यांना मार्ग मिळावा म्हणून न्यायालयाने काही सुचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये कोणत्याही वादाचा मसुदा दाखल करतांना त्या वादाच्या मसुद्याच्या शेवटी वादी, प्रतिवादी आणि या दोघांच्या वकीलांनी आपले ईमेल आयडी, व्हॉटसऍप संकेतस्थळ असलेला मोबाईल नंबर किंवा दुसरा फोन नंबर असेल तर तो नंबरपण आपल्या वादाच्या मसुद्याच्या शेवटी लिहिणे आवश्यक आहे. प्रबंधकांनी या मार्गदर्शक सुचनांची दखल घ्यावी असे न्यायमुर्ती एम.जी. शेवलीकर यांनी आपल्या आदेशात लिहिले आहे.
वकीलांनी वाद दाखल करतांना वादाच्या मसुद्यात वादी, प्रतिवादी आणि वकील यांचे ईमेल आयडी व मोबाईल नंबर लिहिणे बंधनकारक