एका युवकाकडून 9 मोबाईल जप्त
नांदेड(प्रतिनिधी)-16 जुलै रोजी एका पायी जाणाऱ्या माणसाला ऍटो बसवून त्याचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार चोरट्यांना वजिराबाद पोलीसांनी पकडले आहे. तसेच एक 23 वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून चोरीचे 9 मोबाईल जप्त केले आहेत.
दि.16 जुलै रोजी दिपक लुंगारे हे खुराणा ट्रॅव्हल्सकडून जायी जात असतांना एक ऍटो थांबवला आणि तुम्ही पायी का जात आहात बसा असे सांगून त्यांना ऍटो रिक्षात बसवून घेतले. ते ऍटोत बसल्यावर त्यांचा मोबाईल चोरून घेण्याचा प्रयत्न केला. वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने या बाबत दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 246/2021 मध्ये मजहर खान फारूख खान(22) ऍटो चालक रा.मिल्लतनगर नांदेड, मोहम्मद शाहरुख मोहम्मद सलाउद्दीन सिद्दीकी (26) ऍटो चालक रा.खडकपुरा पंचशिलनगर, सय्यद आरेफ सय्यद अली (40) पेंटींग काम रा.कंधार, शेख मुबीन शेख मदार (44) भाजीविक्री रा.गांधीनगर, गुलचंन कॉलनी नांदेड या चार जणांना पकडले. दिपक लुंगारेचा मोबाईल त्यांनी काढून दिला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे आहे. शिवाजी शिंदे यांनी चोरीला गेलेला मोबाईल आणि ऍटो असा 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि.17 जुलै रोजी एक संशयीत युवक फिरतांना पाहुन वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने त्याची चौकशी केली. त्याचे नाव शाहरुख खान अली शेर खान (23) रा.सखोजीनगर नांदेड असे आहे. त्याच्याकडून चोरी केलेले 9 मोबाईल पोलीसंानी जप्त केले आहेत. त्या मोबाईलची किंमत 60 हजार रुपये आहे. पोलीस अंमलदार शेख इम्रान शेख एजाज यांच्या तक्रारीवरुन शाहरुख खान विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, गजानन किडे, मनोज परदेसी, चंद्रकांत बिरादार, संतोष बेल्लूरोड, शरदचंद्र चावरे, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम, शेख इम्रान यांचे कौतुक केले आहे.
ऑटोत प्रवाशांचा मोबाईल व पैसे चोरणारे चोरटे वजिराबाद पोलीसांनी पकडले