नांदेड(प्रतिनिधी)-एका 70 वर्षीय वयोवृध्द माणसाच्या विश्वासाचा गैरफायदा घेवून तीन जणांनी त्यांच्या एटीएममधून 1 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार किनवट येथे घडला आहे. या फसवणूक करणाऱ्यांमध्ये एक महिला आहे.
गणपत शामराव गादेवार (70) रा.बोधडी (बु) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.12 मे 2021 ते 23 ते 2021 दरम्यान त्यांच्या आजारपणाचा आणि विश्र्वासाचा गैरफायदा घेवून सिद्दीविनायक उर्फ सिधु सुधाकर डोंगरे, सुधाकर डोंगरे, निमाबाई सुधाकर डोंगरे सर्व रा.बोधडी (बु) यांनी त्यांच्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांना न सांगता 1 लाख रुपये काढून घेतले. गणपत गादेवार यांची मुले बाहेरगावी होती त्यांना बोलावल्यानंतर, बॅंक नोंदी तपासल्यानंतर 19 जुलै रोजी या बाबत तक्रार देण्यात आली आहे.
किनवट पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 34 नुसार गुन्हा क्रमांक 228/2021 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.
70 वर्षीय माणसाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत एटीएममधून 1 लाख लंपास