2 लाखांची बुलेट गाडी चोरीला गेली
नांदेड(प्रतिनिधी)-वॉकींग करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 75 हजारांचे सोन्याचे गंठण तोडण्यात आले आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 2 लाख रुपये किंमतीची दुचाकी चोरण्यात आली आहे. इतर चार दुचाक्या चोरीला गेल्या आहेत. एकूण 6 चोरी प्रकारांमध्ये 3 लाख 32 हजार 975 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
साहेबराव लछमाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.19 जुलै रोजी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास हनुमानगड रस्त्यावर त्यांची पत्नी आणि मुलगी वॉकींग करत जात असतांना एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे गंठण, 75 हजार रुपये किंमतीचे बळजबरीने तोडून नेले आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक ठाकूर हे करीत आहेत.
सुखचेतसिंघ महेंद्रसिंघ खैरा यांनी 26 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता आपली दुचाकी बुलेट गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एम.गुरूद्वारा गेट क्रमांक 4 जवळ उभी केली होती. रात्री 11.30 वाजेपर्यंत ही दुचाकी चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 2 लाख रुपये आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार ढगे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 17 जुलैच्या रात्री 10 ते 18 जुलैच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान रामनगर कौठा येथून संजयसिंह चरणसिंह गोरे यांच्या घरासमोर ठेवलेली त्यांची बुलेट गाडी क्रमांक एम.एच.26 बी.के.5113 ही 45 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गिते अधिक तपास करीत आहेत.
रवि आनंदराव सरवदकर यांचे घर बसंतानगर नांदेड येथे आहे. 9 जुलै रोजी सायंकाळी 7.30 ते 8.30 या एकातासाच्या वेळेत त्यांच्या घरासमोर उभी केलेली दुचाकी गाडी 82 हजार 957 रुपयांची चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
गुरूजी हॉस्पीटलच्या मार्केटमधून 14 जुलै रोजी रात्री 8.30 ते 9.30 या एकातासाच्या वेळेत ऍड.रमेश विनायकराव राजूरकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.क्यु.4296 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बोरकर हे अधिक तपास करीत आहेत.
नागोराव लक्ष्मणराव बेलूरे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.7322 ही 10 हजार रुपये किंमतीची गाडी 17 जुलैच्या रात्री 9 ते 18 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान आनंदीबाईनगर उमरी येथून त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. उमरी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गवलवाड अधिक तपास करीत आहेत.
वॉकींग करणाऱ्या महिलेचे गंठण चोरट्यांनी तोडले