नांदेड(प्रतनिधी)-जापानमध्ये सुरू झालेल्या ऑलॅम्पीक क्रिडा स्पर्धामध्ये भारताच्या सुर्यनमस्कार या योग पध्दतीला सुध्दा प्रदर्शित करण्यात आले. सूर्यनमस्कार करतांना त्यात सामील असलेले सर्व जण जापानचे रहिवासी आहेत. दुर्देव भारतीय व्यक्तींना मात्र सुर्यनमस्कार करण्यात तेवढासा रस नाही.

जापान या देशात ऑलॅम्पीक स्पर्धांना सुरूवात झाली. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अत्यंत भव्य-दिव्य पार पडला. वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या विशेष बाबींना या उद्घाटन सोहळ्यात दाखविण्यात आले. भारतातील सुर्यनमस्कार या योग पध्दतीला सुध्दा तेथे स्थान मिळाले. संस्कृत मंत्रांसह जापानी युवक-युवतींनी सुर्यनमस्कार करून दाखवले.
20 व्या शतकाअगोदर औंधचे राजा यांनी सुर्यनमस्कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध 12 पध्दती अंमलात आणल्या. सुर्यनमस्कार भारतीय पध्दतीनुसार सुर्य या देवतेला प्रणाम असला तरी त्यातील योग पध्दतीमुळे शरिराला मिळणारा व्यायाम सुध्दा महत्वपूर्ण आहे. त्या व्यायामाने शरिरातील अनेक व्याधींना पुर्णविराम लागतो आणि माणसाच्या मनात नेहमी उत्साह वाढतो.
जापानमधील ऑलॅम्पीक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताच्या सूर्य नमस्कार या योगपध्दतीला दाखवून जगात ही योग पध्दत अंमलात आणा असाच ऑलॅम्पिक स्पर्धा आयोजकांचा प्रयत्न आहे. पण भारतीय लोकांमध्ये सुर्यनमस्कार या योगपध्दतीविषयी हवा तेवढा प्रतिसाद दिसत नाही हे मात्र दुर्देवच.
