नांदेड (प्रतिनिधी) – शनिवारी पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचा महामेळावा भरला होता. त्यात पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी 550 पोलिसांच्या बदल्या केल्या. बदल्या केलेले बहुतांश पोलीस अंमलदार आनंदी आहेत. यानंतरही कोणाला काही अडचण असेल तर ती पोलीस अधीक्षक सोडवतील असा विश्वास पोलीस अंमलदारांना आहे.

नांदेड जिल्ह्यातील पोलीस दलात 3500 पोलीस अंमलदार आहेत. टक्केवारीच्या मानाने 15.71 टक्के बदल्या करण्यात आल्या. शनिवारी हा महामेळावा भरला तेव्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, पोलीस उपअधीक्षक डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, विकास तोटावार, सचिन सांगळे, डॉ. सिद्धेश्वर भोरे उपस्थित होते. 550 पोलीस कर्मचाऱ्यांपैकी 139 अर्थात बदलीच्या टक्केवारीत 25 टक्के कर्मचाऱ्यांना एक वर्षाची स्थगिती देण्यात आली.
संगणकावर दाखवणाऱ्या पदांच्या उपलब्धतेनुसार पोलीस अंमलदारांनी दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही पर्याय उपलब्ध नसेल तर ज्याठिकाणी पोलीस संख्या कमी आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी पोलीस अधीक्षक पोलीस अंमलदारांना सांगितले. सकाळी 9 वाजेपासून सुरू झालेला हा बदली महामेळावा रात्री 1 वाजेपर्यंत चालला. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी दोनदा जेवण करण्यासाठी दहा मिनीटांचा बे्रक घेतला आणि तोपर्यंत सर्व कामकाज बंद ठेवण्यात आला. प्रत्येक पोलिसांना पोलीस अधीक्षक स्वत: बोलत होते आणि त्यांची बदली करत होते.
पोलीस अंमलदारांनी सांगितल्याप्रमाणे जवळपास बहुतांश लोकांना त्यांच्या मर्जीप्रमाणे बदली मिळाली आहे. त्यानंतर काही जणांच्या मर्जीनुसार झालेही नसेल तरी पण पोलीस अधीक्षक अजुनही त्यांची बदली करणे किंवा त्यांची अडचण सोडविण्यासाठी कटीबद्धच आहेत.शनिवारी झालेल्या बदली महामेळाव्याबाबत रविवारी त्यासंदर्भाचा बदली आदेश करण्यात आला. बदली झालेल्या सर्व पोलीस अंमलदारांना त्वरीत प्रभावाने नवीन जागी जाण्यासाठी कार्यमुक्त करावे असे आदेश देण्यात आले आहेत.