नांदेड(प्रतिनिधी)-18 वर्षाच्या वरील व्यक्तीसाठी दि.1 ऑगस्ट 2021 रोजी कलामंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मोफत कोविड लसीकरण घेण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते बिरबल बिरजू यादव यांनी दिली आहे.
नांदेड शहर वाघाळा महानगरपालिका, कलामंदिर ट्रस्ट आणि सामाजिक कार्यकर्ते बिरबल बिरजू यादव यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला व दुसरा हा कोरोना लसीचा डोस जनतेतील 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लसीकरण करुन घेणाऱ्यांनी आपले आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. लसीकरणाचा कार्यक्रम कलामंदिर येथे सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहिल. यासाठी अभिजित पाटील, गौतम जैन, श्रीकांत बनसोडे, राहुल बनसोडे, कैलास बरंडवाल, संजय शर्मा, गोविंद पाळवेकर, धिरज यादव, शितलताई भालके, सचिन माने, किशोर ठाकूर आणि आनंद बामलवा हे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
1 ऑगस्ट रोजी 18 वर्षावरील नागरीकांना मोफत कोरोना लसीकरण