नांदेड(प्रतिनिधी)-हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्या एकाला शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने पकडून त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
28 जुलै रोजी गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार बालाजी रावळे, रवि शंकर बामणे, विशाल अटकोरे हे गस्त करत असतांना त्यांना राजनगर भागात एक व्यक्ती हातात तलवार घेवून दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. त्वरीत प्रभावाने ते त्या ठिकाणी गेले आणि तलवार हातात घेवून दहशत माजविणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव संघपाल रामचंद्र सावंत (28) रा.तळणी ता.जि.नांदेड असे आहे. या व्यक्तीविरुध्द भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार संतोष सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे यांनी शिवाजीनगरच्या गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
हातात शस्त्र बाळगुण दहशत माजविणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल